एक अविस्मरणीय मैत्री दिन [०५ ऑगस्ट २००७]

Friday, August 10, 2007

सहलीचा माझा अनुभव






सचिन काकडे (फ़क्त तुझ्यासाठीच)


५ तारीख एक अविस्मरणीय असा दिवस होता माझ्या आय़ुष्यातला..... पहील्यांदाच अश्य़ा वेगळ्या प्रकारे मी मैत्रीदिन साजरा केला मुंबई आणि पुण्यातले आम्ही काही मित्र एका गेट टू गेदर साठी जमलो होतो .... मित्र म्हणजे फ़क्त ऑर्कुटच्या मराठी कविता या कम्युनीटीवर आम्ही सगळे सदस्य...कविता आणि प्रतिसाद या माध्यमातुन आमची ओळख झाली............ हळु हळु ती ओळख मैत्रीत बदलली .........एखाद गेट टू गेदर कराव्म या उद्देशाने ही सहल आम्ही ठरवली आधि नेटजगत म्हणजे एक भौतीक जग यात जे काही होत ते टाईमपास कींवा काल्पनीक अस मला वाटायचं पण या दिवसाने ते सगळ खोट ठरवलं...... मैत्रीचं नातं सगळ्य़ा नात्यांपेक्षा कीती अनोख असते ते तेव्हा पुन्हा दिसलं........ ती सगळ्यांना भेटण्याची उस्तुकता, ती मजा, अगदी आम्ही सगळे लहाणपनापासुनचे मित्र आहोत अस वाटत होतं कार्यक्रम ही अगदी झक्कास झाला आधी सगळी लेणी पाहील्यावर धबधब्याच्या पाण्यात पुर्ण भिजण्याचा आनंद घेतला, दुपारचे जेवणाची उत्तमच होती त्यासाठी मी पुण्यातल्या मित्रांचे मनापासुन आभार मानतो "डाव्या हाताला तांब्या" म्हणतात अगदी तशीच सोय.........कवीसम्मेलनाचा कार्यक्रम तर मस्तच झाला विठ्ठ्ल-रखमाई देवळात सगळी कवी मंडळी जमा झाली आणि मग त्या देवळात बसुन कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडला.... " अशा प्रकारे मैत्री दिन साजरा करणारा ग्रुप पहिल्यांदा पाहीला " असं एखाद्या अनोळ्खी व्यक्तीने बोलताच पाठीवर कोणीतरी कौतुकाचि थाप मारल्यासारखं जाणवलं खरचं माझ्यासाठी एक वेगळा असा अनुभव आहे हा....... मी सर्व मित्रांचे पुन्हा एकदा आभार मानतो...


संदीप सुरळे (शोधात माझ्याच मी)


' अशा प्रकारे फ़्रेंडशीप डे साजरा कदाचितच होतो....खुपच छान ' असे उदगार काढणार्‍या त्या कोण होत्या ते नाही जास्त आठवत. पण त्यांच हे वाक्य कुठंतरी रुजलं अन असं वाटलं चला जगापेक्षा काहीतरी वेगळं करत आहोत आम्ही मीत्र. खरचं ५ ऑगस्ट हा दिवस आठवणींत राहील. जसा एखादा मोरपीस फ़ुलांनी भरलेल्या फ़ुलदाणीत खोवल्यानंतर त्या फ़ुलदाणीची सुंदरता वाढते , अगदी तसं आयुष्याच्या इतर आनंदात या दिवसानं मोरपिसाचं काम केलं. हा मोरपिस म्हणजे ऑर्कुटवरचे एकत्र आलेले ते वेगवेगळे रंग. सगळं वातावरण रंगीबेरंगी ,हिरवाईनं नटलेले डोंगर, साथीला पाउस, धबधब्यांचा आवाज आणी 'ते कवितांतले शब्द'. सारं सारं भारावुन टाकणारं. दिवस कसा संपला ते कळलंही नाही. वाट पाहतोय पुन्हा एखादा दिवस असा येईल याची ____


अमित डांगे


दि. ५ ऑगस्ट २००७. मैत्रीदिनाचा दिवस. आणि त्याच दिवशी आमची ठरलेली कार्ल्याची एक छोटी सहल. ह्या सहलीमधील एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही सगळे जरी अगदी मैत्रीदिनाच्या दिवशी भेटणार होतो. पण तरी कोणीही कोणालाही ह्या आधी प्रत्यक्षात भेटलेले नव्हते. माझ्याबाबतीत सांगयचे तर मला कित्येक नावेही माहिती नव्हती. पण तरीही सर्वांना भेटण्यासाठी मन आतुरले होतेच. आजच्या ह्या संगणकाच्या युगात एकमेकांपासून दुर असून देखील एक दृढ नाते आमच्या सर्वांमधे निर्माण झाले होते. येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, जरी आम्ही प्रत्यक्षात भेटलो नव्हतो तरी ह्या संगणकाच्या माध्यमातून असे काही बांधले गेलो होतो की प्रत्यक्षात भेटल्यावर देखील असे मूळीच नाही जाणवले की आम्ही आज पहिल्यांदाच भेटतो आहोत. ही सहल जरी का छोटी होती तरी सगळ्यात अविस्मरणीय होती.खरं सांगायचे तर त्यादिवशी झालेली मनाची अवस्था म्हणजे थोडे कुतुहल आणि थोडी हुरहुर होती. काही जण पुण्यातून काही जण मुंबईमधून असे आम्ही सारे जेव्हा कार्ल्याला भेटलो तेव्हा मनातील कुतुहल आणि हुरहुर कुठ्ल्या कुठे पळाली होती आणि उरली होती फ़क्त मित्रांची सोबत. त्या दिवशी कार्ल्याला जमलेली सर्व मित्रांची (आणि कविंची) मैफ़ील मनाला खुपच सुखद आनंद देऊन गेली. आजपर्यन्त न अनुभवलेला एक असा अनुभव देऊन गेली. अजूनही मनाला असेच वाटते की ती भेट म्हणजे फ़ारच छोटी होती. कार्ल्याच्या त्या विठ्ठल मंदिरात जमलेली ती काव्य मैफ़ील आणि एका रसिकाने (खर तर एका कविने दुसर्‍या कविला ) दिलेली ती दिलखुलास दाद, खरच हे सारे अजूनही स्वप्नवतच वाटते. एक दिवस अनुभवलेले सुखद आणि गोड स्वप्न, एक अविस्मरणिय स्वप्न. पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटणारे होते. त्या स्वप्नातून जागे व्हावेसे वाटत नसले तरी सत्य सोडता येत नाही. आता पुन्हा आम्ही सगळे प्रत्यक्षात भेटत जरी नसलो तरी ह्या संगणकाच्या माध्यमातून एकेमेकांशी जोडलेले आहोतच. आणि ही मैत्री कधीही आटणारी नाही ह्याची खात्री मला तरी आहे. ह्या एका छोट्याशा पण तरीही मोठ्या वाटणार्‍या ह्या सहलीने एक अविस्मरणीय अनुभव दिला हे मात्र नक्की.



रुपाली कांबळॆ


माझा धागा परिवार get2gether अनुभव.....या काही ओळीत....

धागा परिवार....हा orkut वर भेटला...
पण ख-या अर्थाने भेट झाली ती
लोनावळ्याच्या कार्ला केव्सला!!

online दिसणारे मित्र-मॆत्रीणी
आज प्रत्यक्शात भेटले
सगळ्यांना पहिल्यांदा भेटुनही
कोणी अनोळखी नाही वाटले

कार्ल्याची चढण चढताना
पाऊस दाटत गेलासोबतच
picnicच्या उत्साहाचा जोर चढत गेला

दुपारच्या जेवणाचा बेतही होता
खासनंतर मात्र चरोळ्या आणि कवितांचा
दरवळला सुवास शब्दांच्या

त्या मॆफलीत मन असं गुंतलं
चिंबचिंब होऊन त्यात मनसोक्तं भिजलं

एक सुवर्ण आठवण म्हणुन
मनात ठेऊन गेलास
गळ्यात अविस्मर्णिय असा
हा get2gether झाला....



सनिल पांगे


कार्ला Get together म्हणजे एक अविस्मरणीय दिवस. हा दिवस सफल ज्यांच्या मुळे झाला, ते सचिन, अनंत व कुणाल, यांचा मी विशेष आभारी आहे. त्यांनी घेतलेल्या पुढाकार, व उत्कृष्ट नियोजना मुळेच हे Get together success झालं. काही कारणास्तव अनंत येऊ न शकल्या मुळे थोडा Mood off झाला, पण तरीही इतर सर्व ठरल्या प्रमाणे आल्या बद्दल खुप बरं वाटलंकोणी कोणाला ओळखत नसतानाही, कधी भेटले नसतानाही, तसं काही मनातही कोणाच्या आलं नाही, हे मी विशेष मानतो. या वरून हेच सिद्ध होते की प्रत्येकाचा इतरां विशषी मनात किती जिव्हाळा, प्रेम व मैत्रीचे एक घनिष्ट नातं आहे.बाकी Get together Programme बद्दल मी जास्त काही सांगत नाही, कारण प्रत्येकाने ते व्यक्त केलं असणारचं. फक्त मी मनापासून अतिशय enjoy केलं.असेच Get together Programme नियमीत आयोजीत व्हावे ही माझी मनापासून इच्छा आहे


गणेश जगताप

त्या सोनेरी दिवशी आमची भेट झालि , शब्दांच्या मधुर माध्यमाने झालेल्या ओळखेस मैत्रीदिनी मैत्रीची नवी दिशा मिळाली , ते सुंदर ठिकाण पण त्याहुन सुन्दर मित्र-मैत्रीनी भेट्ल्याने मन अगदी आनंदुन गेले. आजुनहि त्या आनंदाचे तरंग उठतायेत या ह्रदयात...मित्रांचा प्रेमाचा झरा आणि थंड गार धबधबा यांमध्ये भिजण्याची जी मजा आली ते मी कधीच विसरनार नाही, तसेच त्या डॉक्टर आणि त्यांनी काधलेले उदगार , 'अशा प्रकारे फ़्रेंडशीप डे साजरा कदाचितच होतो....खुपच छान ' मनाला एक सुखद स्पर्श करुन गेला.जेवताना पण खुप मजा आली आणि nonveg म्हनजे मराठीत chiken , हे आठवले तरी , सर्वांचे मोहक हसणे अजुन डोळ्यांसमोर येते .डोळ्यात वाटआनि मनात तुमचाच भाससांगा ना मित्रांनोकधी भेदनार भेटुनपुन्हा ह्रदयचा आस---------- ग़णेशा

1 comment:

संदीप सुरळे said...

आज ७ औगस्ट २००८. परवा एक वर्ष झालं ना रे मित्रांनो जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो.
कार्ला इथं धमाल केली होती. पावसात चिंब भिजून ओलं झालो हे खरं,पण अंगात धमक, जाऊन उड्या मारल्या त्या धबधब्यात. सच्या, थंडीनं काकडून खराखुरा 'काकडे' झाला होता तेव्हा. आणी मी पाण्यात आपटलोच होतो, पण तेवढयात गण्याने धरलं मला. मी वाचलो,गण्या आपटला.(बिचारा नेहमीच आपटंत असतो)सनिलदा,कुण्या,रेशमा,रजनी,सुधीर,सुधार्थी,दीपक,सचीन,गणेश,पुष्कर,प्रमोद,संतोष,निलेश,रुपाली आणि मी.एवढी सगळी मित्रमंडळी,काव्यप्रेमी,कवी पहिल्यांदाच भेटली होती एकमेकांना. एक वेगळा अनुभव. जेवतानाची धमाल,तिथला तो निसर्ग,काव्यवाचन, अन मग निरोपाची वेळ सगळं आता स्वप्नवत वाटतं....Those are unforgettable Days..Miss u all..n miss those days..which are gone!